December 12, 2025 2:42 PM

views 30

बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांचा सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय

बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पुढल्या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.   मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारमध्ये आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. &n...

December 12, 2025 2:36 PM

views 70

१९ वर्षांखालच्या आशियाई क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईमधे सुरु

१९ वर्षांखालच्या आशियाई क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईमधे सुरु होत आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या पहिल्या  सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत.

December 12, 2025 1:46 PM

views 42

दक्षिण आफ्रिकेतील लायबेरिया आणि भारत यांच्यात सामंजस्य करारावर

औषधांची गुणवत्ता राखण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लायबेरियानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे सुरक्षित आणि परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता वाढेल, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताचे लायबेरियातले राजदूत मनोज बिहारी वर्मा आणि लायबेरियाचे आरोग्य मंत्री डॉ. लुई एम. कपोटो यां...

December 12, 2025 1:42 PM

views 60

संसदेच्या दोन्ही सभागृहात संसदेवर झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली

लोकसभेत आज कार्तिगाई या दीपप्रज्वलनाच्या प्रथेवरून द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं. आज सकाळी कामकाज सुरु झाल्यावर सदनाच्या सदस्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना आदरांजली वाहिली.   लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला शिवराज पाट...

December 12, 2025 1:27 PM

views 59

स्क्वॉश विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चेन्नईमध्ये सुरु असलेल्या स्क्वॉश विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या गट ब सामन्यात, भारतानं ब्राझीलवर ४-० असा दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वेलावन सेंथिलकुमारनं पेड्रो मोमेट्टोवर ३-० नं मात करत विजयामध्ये योगदान दिलं. भारतानं  यापूर्वी आपल्या  पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडला ४-० असं हरवलं ...

December 12, 2025 1:19 PM

views 74

Rajyasabha: देशाच्या कृषी उत्पादनात ४४ टक्के वाढ

गेल्या दहा वर्षांत देशाच्या कृषी उत्पादनात ४४ टक्के वाढ झाली असून, हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांनी ही माहिती दिली.   बियाण्याचं नवं वा...

December 12, 2025 1:02 PM

views 34

आंध्र प्रदेशामध्ये एका बस अपघातात ९ जणांचा मृत्यू, तर २२ जण जखमी

आंध्र प्रदेशातल्या अल्लुरी सीता रामाराजू जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. तुळसीपाका गावाजवळ चिंतुरू-मरेदुमिल्ली घाट या रस्त्यावरून ही खासगी बस तेलंगणा राज्याकडे जात होती. पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून गंभीर जखमी झालेल्या ...

December 12, 2025 10:55 AM

views 29

नेपाळमध्ये काठमांडू इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 कलमी करार

नेपाळमध्ये काठमांडू इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार आणि जेन झेड प्रतिनिधींच्या दरम्यान 10 कलमी कराराला मान्यता देण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.   प्रधानमंत्री कार्यालयातील सिंह दरबारात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. जेन झेड चळवळीदरम्यान मृत आणि जखमी झा...

December 12, 2025 10:46 AM

views 60

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्...

December 12, 2025 10:43 AM

views 67

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते इम्फाळमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संध्याकाळी इम्फाळमधील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या समारंभात 1 हजार 3 शे 87 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. राष्ट्रपती कालपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.   याप्रसंगी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्...