July 19, 2025 1:16 PM

views 24

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीची घोषणा

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्की मधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्राएलनं सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली. दरम्यान आपले हल्ले ड्रुझ या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्राएलनं केला आहे.   सीरि...

July 19, 2025 1:12 PM

views 61

छत्तीसगड : नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगड मधे नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. राज्याचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुझमाडच्या जंगलात कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद...

July 19, 2025 11:28 AM

views 32

लॉस एंजेलिसच्या शेरीफ विभागातील स्फोटात तीन जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या पूर्व लॉस एंजेलिसमधील एका प्रशिक्षण केंद्रात काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागातील तीन अनुभवी अधिकारी ठार झाले. स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, 1857 मध्ये या विभागाची स्थापना झाल्यापासून ही मोठी दुर्घटना असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

July 19, 2025 10:57 AM

views 64

प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु- अमित शहा

देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. 21व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात देशात खेळांना खूप महत्...

July 19, 2025 10:07 AM

views 39

पोलाद उद्योगाची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा प्रधानमंत्र्यांद्वारे गौरव

पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत, ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचे केंद्र होतं अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी पश्चिम बंगालचा गौरव केला. पश्चिम बंगालमध्ये काल तेल, वायू, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रामधील पाच हजार...

July 19, 2025 9:30 AM

views 38

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन

देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आयआयसीटीचं उद्घाटन काल मुंबईत झालं. केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.  ...

July 19, 2025 9:19 AM

views 43

देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाणार

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाईल असं काल जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते.   ते म्हणाले की, सरकारन सहा सेमीकंडक्टर प्लांट...

July 18, 2025 8:22 PM

views 32

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत. अबुझमाड भागात दुपारी ही चकमक झाली. अजूनही काही माओवादी त्या भागात लपलेले असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरु आहे.   

July 18, 2025 8:16 PM

views 52

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे ६३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्याने नुल्ला लेह मधे अचानक पूर उद्भवला आहे. गेल्या २ दिवसात वीज अंगावर कोसळून किंवा पावसामुळे बांधकाम कोसळून ४४ जण दगावले....

July 18, 2025 8:13 PM

views 35

मुंबईत ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची बैठक

गोव्यात होणारा ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली. बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते. सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून  सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे...