December 19, 2025 8:13 PM

views 50

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे- मुख्यमंत्री

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या विचारातून हे शक्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्य...

December 19, 2025 8:12 PM

views 50

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला सामना सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.  शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद ६ धावा झाल्या होत्या. या मालिकेत...

December 19, 2025 8:09 PM

views 55

विश्वचषक विजेत्या दृष्टिबाधित महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंचा मुंबईत सत्कार

विश्वचषक विजेत्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज मुंबईत सत्कार केला. या खेळाडूंना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार गंग...

December 19, 2025 8:08 PM

views 39

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली.    तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पा...

December 19, 2025 8:17 PM

views 65

पारंपरिक औषधशास्त्राचं महत्त्व वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं-प्रधानमंत्री

पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण...

December 19, 2025 8:02 PM

views 55

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला न्यायालयाचा नकार

सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली नसल्यानं त्यांची आमदारकी जाईल, अशी माहिती या प्रकरणातल्या वकील श्रद्धा ढुबे-पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. मात्र वैद्यकीय कारणास...

December 19, 2025 1:44 PM

views 46

उत्तर भागात धुक्याची चादर

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. पूर्व उत्तर भारतात उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आजपासून २१ डिसेंबरपर्यंत सकाळी आणि रात्री दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्येही हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.   धुक्यान...

December 19, 2025 1:44 PM

views 60

युक्रेनला कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांची सहमती

युक्रेनला ९० अब्ज युरो कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सहमती दर्शवली  आहे. युक्रेनला साहाय्य करण्यासाठी रशियाच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर करण्यावर  सहमती न झाल्यामुळे युरोपियन युनियननं या निर्णयाला अर्थसंकल्पीय समर्थन दिलं. ब्रुसेल्स इथल्या  शिखर परिषदेत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घे...

December 19, 2025 1:32 PM

views 53

लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रपतींचं संबोधन…

बदलत्या तंत्रज्ञानातली आव्हानं ओळखून जागतिक दर्जाचे सनदी अधिकारी घडवण्यावर लोक सेवा आयोगांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. हैद्राबादमध्ये आयोजित देशातल्या लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचं उदघाटन करताना त्या आज बोलत होत्या.   याआधी बोल...

December 19, 2025 1:25 PM

views 70

राष्ट्रीय संरक्षण अधिकरण कायद्यावर अमेरिकेची स्वाक्षरी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या राष्ट्रीय संरक्षण प्रमाणीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. मुक्त आणि शांततापूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत आणि क्वाड देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी  आणि चीनने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कायद्याचं महत्व आहे. अमेरि...