भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी हाँगकाँग इथं सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर सांघिक स्कॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
अनहत सिंग हीनं साखळी फेरीत सर्व सामने ३-० ने जिंकत, भारतीय महिला संघाला ब गटात दुसरं स्थान मिळवून दिलं, आणि भारताचं अंतिम चारमध्ये स्थान पक्क झालं. आता उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे.
भारताच्या पुरुष संघानं हाँगकाँगचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज उपांत्य फेरीत त्यांचा सामना मलेशिया विरोधात होणार आहे.