युनायटेड किंगडमच्या काही भागांत झालेली हिंसक आंदोलनं आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधल्या भारतीय दूतावासानं युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युकेच्या साऊथ पोर्ट भागात हिंसाचारामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हल्लेखोरांबद्द्दल चुकीची माहिती प्रसारित झाल्यामुळे काही ठिकाणी स्थलांतर विरोधी हिंसक निदर्शनं झाली. या पार्श्वभूमीवर युकेला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी असं भारतीय दूतावासानं म्हटलं आहे.
Site Admin | August 6, 2024 7:53 PM | Indian High Commission | UK
भारतीय दूतावासाकडून युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
