मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते काल मुंबईत एका प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, महायुती सरकार महानगर झोपडपट्टीमुक्त करेल आणि गरिबांना शहरात परवडणारी घरे मिळतील याची काळजी घेईल.
एक लाख लोकांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीतून 350 कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आपले सरकार गरीब समर्थक असल्याचे सांगून ते म्हणाले की झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकीची घरे उपलब्ध करून देणे हे त्यांच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरही टीका केली आणि ही योजना बंद करण्याच्या विरोधकांच्या योजनेबद्दल त्यांनी सावध केले.