जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल राज भवन इथं जागतिक आर्थिक मंचाच्या युवा जागतिक नेत्यांच्या ५० सदस्यीय प्रतिनिधी मंडळाला संबोधित करत होते. या प्रतिनिधी मंडळात ४० देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. युवा नेतृत्वाकडे समान आणि शाश्वत जग उभं करण्याची अधिक क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, टेनिसपटू रॉजर फेडरर, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही युवा जागतिक नेतृत्वाचं प्रतिनिधित्व केल्याचं त्यांनी सांगितलं. समावेशक विकासासाठी युवकांनी आपलं योगदान द्यावं असं आवाहन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं.
Site Admin | February 15, 2025 6:18 PM | Governor C.P. Radhakrishnan
जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची-राज्यपाल
