दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य असल्याचं देशाच्या संवैधानिक न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित निर्णयात न्यायालयाच्या ८ पैकी ६ न्यायाधिशांनी यून यांना पदावरून हटवण्याच्या बाजूनं कौल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ६० दिवसांच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणं आवश्यक आहे. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत प्रधानमंत्री हॉर्न डक सू काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतील.
Site Admin | April 4, 2025 1:34 PM | yoon suk yeol
यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य – संवैधानिक न्यायालयानं
