उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं संपन्न होत असलेला महाकुंभ मेळा शाश्वत अभिमानाचे प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून नव्या भारताचे भव्य, दिव्य आणि डिजीटल स्वरुप दिसेल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रयागराज इथं १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत होतो आहे.