भारतीय कुस्ती महासंघावरची बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्यानंतर बंदीला आव्हान देणारी महासंघाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकालात काढली आहे. दरम्यान, महासंघाच्या नेमणुकीविषयी तक्रार असल्यास तक्रारदार खेळाडूंना या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येईल, असं मुख्य न्यायधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी सांगितलं. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत काही आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी त्यांच्या नेमणुकीला आव्हान दिलं होतं.
Site Admin | March 11, 2025 8:49 PM | Wrestling Federation of India
भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी क्रीडा मंत्रालयानं उठवली
