क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमधे अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मंत्रालयानं सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची निवड नि: पक्षपातीपणे, पारदर्शकपणे आणि क्रीडा संहिता, कुस्ती नियम आणि इतर अधिकृत निर्देशांचे पालन करून करण्याचं तसचं महासंघाला आपल्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत समतोल राखण्याच्या आणि निलंबित किंवा बडतर्फ अधिकाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.