डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 16, 2025 3:36 PM | WPL 2025

printer

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय

बडोद्यात सुरु असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २ गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. 

 

दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सना प्रथम  फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सनी १६४ धावा  केल्या, यात नॅट साइवर ब्रंट ने नाबाद ८० तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं ४२ धावांचं योगदान दिलं. संघातल्या इतर खेळाडू मात्र दशकाचा आकडा गाठण्यातही असफल ठरल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या ऍना सदरलँड हिने ३ गाडी बाद केले तर शिखा पांडे ने २ आणि  मिन्नु मनी, एलिस कॅप्सी यांनी प्रत्येकी १ गाडी बाद केले. 

 

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं दमदार सुरवात केली. कर्णधार  मेग लॅनिंग आणि  शफाली वर्मा या दोघीनी  पावरप्ले मध्येच आपल्या संघाची धावसंख्या ६० वर पोहचवली होती. संघानं आपली धावसंख्या कायम वाढवत ठेवली आणि शेवटच्या चेंडूवर अरुंधती रेड्डीनं विजयासाठी आवश्यक २ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा