भारत हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण असून इथे बारमाही पर्यटन शक्य असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटनाचा विकास अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठा हातभार लावतो असं सांगून ते म्हणाले की २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात पर्यटन उद्योगाची महत्त्वाची भूमिका असेल.
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पर्यटन राज्य मंत्री सुरेश गोपी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कारांच्या मानकऱ्यांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.