जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाने नंदुरबार इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी विभाग आश्रमशाळा डिजीटल करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. हिंगोली शहरातल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक इथं मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन झालं. अहेरी तालुक्यातल्या चेरपल्ली इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्राम यांनी आदिवासी भवनाचं लोकार्पण केलं.
देसईगंज इथं क्रांतीसूर्य बिरसा मुंडा समितीने गुणवंत विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला. गडचिरोलीत तसंच गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यात चिंचगडमध्ये आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी रॅली काढली. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं ७५ मीटर लांबीच्या तिरंग्याची यात्रा काढण्यात आली. नांदेड शहरातही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. लातूरमध्ये तिरंगा यात्रा उपक्रमानं या अभियानाची सुरुवात झाली.