जागतिक टेबल टेनिस स्टार 2025 स्पर्धेची सुरुवात काल कतारमधील दोहा इथं झाली. पुरुष एकेरी पात्रता फेरीमध्ये, भारताच्या अनिर्बन घोषने इराणच्या नवी शम्सचा 3-2 असा पराभव केला, स्नेहित सुरवज्जुलानं पायस जैनचा 3-1 असा, तर मानुष शाह यानं फ्रान्सच्या फ्लोरियन बोरासॉडचा 3-1 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या पोयमंती बैस्या हिला तैपेईच्या हुआंग यू-जीकडून 1-3 नं पराभव पत्करावा लागला. स्पर्धेमध्ये 12 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी होत असून यात मनिका बत्रा, श्रीजा अकुला, अहिका मुखर्जी, सुतीर्थ मुखर्जी, मानव ठक्कर आणि शरथ कमल यांचा समावेश आहे.
Site Admin | January 7, 2025 10:52 AM | World Table Tennis Stars 2025