रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या रेडिओ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोल होते. आकाशवाणी ही जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून ही देशाच्या ९८ टक्के लोकांपर्यंत पोहचत आहे. आकाशवाणीने सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा आकाशवाणीच्या बातम्या आणि कार्यक्रमातल्या माहितीवर विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 13, 2025 9:04 PM | World Radio Day
रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत-संजय जाजू
