भारताच्या पहिल्या वहिल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स अर्थात जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेला आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात सुरुवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेतअंतर्गत विविध क्रीडा प्रकारांच्या एकूण ९० पेक्षा जास्त स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत भारताचा १४५ खेळाडूंचा चमू सहभागी झालाआहे. यात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रवीण, नवदीप आणि धरमबीर यांचाही समावेश आहे. याशिवाय स्पर्धेत सौदी अरेबिया, जर्मनी, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, फिलीपिन्स, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका यांच्यासह १९ देशांमधले पॅरा-ॲथलीट्सही सहभागी झाले आहेत आहेत.
Site Admin | March 11, 2025 7:55 PM | World Para Grand Prix Delhi
जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेला आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात सुरुवात
