डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारत अव्वल

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं 134 पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गोळफेकीत भारतानं तीनही पदकं पटकावली. तर पुरुषांच्या 200 मीटर टी 35 गटात भारताच्या विनयनं रौप्य तर अभिषेक जाधवनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर टी 35-टी 38 गटात भारताच्या प्रीती लाल हिनं कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेतलं प्रीतीचं हे दुसरं पदक आहे. तिनं 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा