डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सिंहांच्या संवर्धनासाठी आज जागतिक सिंह दिन साजरा

जंगलचा राजा सिंहाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज जागतिक सिंह दिवस साजरा केला जात आहे. सिंहांची घटती संख्या आणि त्यांचं विविध धोक्यांपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज-याकडे जगाचं लक्ष वेधणे; हा या दिवसाचा उद्देश आहे. भारतात सिंहांच्या संवर्धनाला सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. केवळ गीरच्या जंगलात आढळणार्‍या आशियाई सिंहाचं भारत माहेरघर आहे. या प्रदेशातील संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे 2015 मधल्या सिंहांची संख्या 523 वरून 2020 वर्षामध्ये 674 पर्यंत वाढली असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

 

15 ऑगस्ट 2020 रोजी घोषित केलेला ‘सिंह प्रकल्प’ हा सर्वसमावेशक, दीर्घकालीन संवर्धनाच्या प्रयत्नांद्वारे आशियाई सिंहांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक महत्वाचा उपक्रम आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक शाश्वत वातावरण तयार करण्यावर केंद्रित असून यामुळे सिंहांच्या संख्येत वाढ होईल. या उपक्रमाच्या प्रमुख घटकांमध्ये सिंहांचा अधिवास सुधारणे, रेडिओ-कॉलरिंग आणि कॅमेरा ट्रॅप यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यावर देखरेख ठेवणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष सोडवणे यांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा