एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र २०२८ ते २०३० पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट पार केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राला देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल, असं ते म्हणाले. पाश्चिमात्य संस्कृतीत जो सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे, असं फडनवीस म्हणाले.