डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक आरोग्य संघटनेकडून नवी मार्गदर्शक तत्व जारी

उच्च रक्तदाब आणि हृदयरोगावर प्रतिबंधक उपायांचा एक भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. त्यात नेहमीच्या मिठाऐवजी पोटॅशियमचं प्रमाण अधिक असलेल्या मिठाच्या वापराची शिफारस करण्यात आली आहे. तसंच, सोडियमच्या अतिरिक्त वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. सोडियमच्या अतिरिक्त सेवनामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या विकारांमुळे दरवर्षी १ कोटी ९० लाख मृत्यू होतात, असं संघटनेने केलेल्या संशोधनातून दिसून आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा