विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि 26 राज्य तसंच 18 केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं. जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील.
अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवे शोध, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा संगम या उपक्रमाचा मुख्य भाग असेल. अन्न प्रक्रियेमध्ये भारत एक जागतिक बलस्थान म्हणून उदयाला येत असल्याचं यामध्ये ठळकपणे मांडण्यात आलं आहे.