वर्ल्ड फूड इंडिया २०२४ या चार दिवसीय महामेळाव्याचा समारोप आज नवी दिल्ली इथं होत आहे. हा मेळाव्याला १९ सप्टेंबरपासून भारत मंडपम इथं सुरुवात झाली होती. जवळपास ९० देश, २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, १८ केंद्रीय मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम अन्नप्रक्रियेतील जागतिक केंद्र म्हणून भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो. यात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नावीन्य, तंत्रज्ञान आणि स्थैर यातल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाला अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
Site Admin | September 22, 2024 1:54 PM | World Food India