आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे. शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उदि्दष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं अलिकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता.
तणाव, हिंसा आणि सामाजिक असंतोषासह अनेक जागतिक आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता ध्यानधारणेत असल्याचं मानलं जातं. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राचीन काळापासून ध्यानधारणा केली जाते. आज या दिनानिमित्तानं न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात भारताचे स्थायी मिशनचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.