जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला आणखी एक सामना अनिर्णित राहिला. सलग तिसरा सामना बरोबरीत सुटल्यानं अंतिम फेरीत लिरेन आणि गुकेश यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंना अजूनही विजेतेपदासाठी प्रत्येकी साडेचार गुणांची आवश्यकता आहे. लिरेननं सलामीचा गेम जिंकला तर गुकेशनं तिसऱ्या गेममध्ये विजय मिळवला होता. दुसरा, चौथा आणि पाचवा हे तीन सामने बरोबरीत सुटले होते.
Site Admin | December 2, 2024 7:43 PM | World Chess Championship Tournament