फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
त्याने त्याचा प्रतिस्पर्धी चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा या १४ व्या फेरीअखेर पराभव केला. या अंतिम सामन्याच्या पहिल्या १३ फेऱ्या बरोबरीत सुटल्या होत्या.
या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुकेशचं अभिनंदन केलं. या यशामुळं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारत एक शक्तिकेंद्र म्हणून उदयाला आला आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.