बुद्धिबळातला जगज्जेता गुकेशचं आज चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता ठरल्यानंतर तो आज पहिल्यांदाच त्याच्या घरी आला. त्याच्या चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी क्रीडा मंत्रालयाचे उच्चाधिकारी उपस्थित होते. आपलं लहानपणापासूनचं स्वप्न जागतिक अजिंक्यपद पटकावल्यावर पूर्ण झालं अशी भावना त्यानं व्यक्त केली.
Site Admin | December 16, 2024 3:44 PM | Chennai Airport | DGukesh