बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशानं १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकार आणि लातूरच्या फिनिक्स फाऊंडेशनतर्फे मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये विशेष परिसंवादाचं आयोजन केलं आहे.
चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत होणाऱ्या परिसंवादाचं उद्घाटन पद्मश्री भारतभूषण त्यागी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. या परिसंवादात देशभरातील बांबू संशोधनात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थाचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत.