लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत घ्या, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलत होते.
विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, राज्यात परिवर्तन व्हावं ही जनतेची भावना आहे. त्यामुळे आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे, असं ते म्हणाले.