१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्सच्या फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. जी कमलीनी हिने अर्धशतक केलं. त्याआधी स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी अंतिम चारमधे आपलं स्थान निश्चित केलं आहे.