महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं सुरुवात होणार आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली.
विश्वचषक स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलँड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळतील, दोन्ही गटामधले प्रत्येकी दोन सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ६ ऑक्टोबरला भारत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत देईल. ४ ऑक्टोबरला न्यूझिलँड, ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरोधात तर १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघाचा सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.