महिला क्रिकेटमधे, आज नवी मुंबईत डी वाय पाटील स्टे़डिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १६ षटकात ५ बाद ११० धावा झाल्या होत्या. कर्णधार स्मृती मंधनानं तडाखेबंद अर्धशतक करताना ४१ चेंडूत ६२ धावा केल्या.
तीन सामन्यांच्या या मालिकेत, रविवारी याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४९ धावांनी विजय मिळवला होता. तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमधे येत्या २२, २४ आणि २७ तारखेला एकदिवसीय सामने होणार आहेत.