डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री

देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव मध्ये आज झालेल्या लखपती दिदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या ११ लाख नव्या लखपती दीदींना, प्रतिकात्मक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला गेला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत १ कोटी लखपती दीदी झाल्या आहेत, तर गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी ११ लाख लखपती दीदींची भर पडल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ सिंदे, आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 

नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारनं कोकणाचाही विचार करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

 

देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत महिला मुख्य प्रवाहात आल्या, तरच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नार-पार-गिरणा योजनेच्या निविदा प्रक्रियेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. तर राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प करू या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा