अमरावतीजवळच्या नांदगाव पेठ इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांना आज सकाळपासून मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. दुपारनंतर यातल्या शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, या महिला नेहमीप्रमाणं कामावर हजर झाल्यानंतर पाणी प्यायल्यावर त्यांना हा त्रास सुरू झाल्याचं एका महिलेनं सांगितलं.