महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालच्या टी ट्वेंटी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अ गटातल्या सामन्यात आज यजमान मलेशियाचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी क्वालालंपूरच्या मैदानात उतरलेल्या मलेशियाला फक्त ३१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या वैष्णवी शर्मानं ५ तर आयुषी शुक्लानं ३ गडी बाद केले. भारतानं विजयासाठी असलेलं ३२ धावांचं लक्ष्य दोन षटकं आणि पाच चेंडूतच पूर्ण केलं.
Site Admin | January 21, 2025 3:33 PM | U19 T20 WorldCup | Women Cricket
Women Cricket : १९ वर्षांखालच्या T20 आयसीसी विश्वचषक सामन्यात भारताची मलेशियावर मात
