मलेशिया इथ सुरू असलेल्या २० षटकांच्या १९ वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज अ गटात भारतीय संघाचा सामना यजमान मलेशिया संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार क्वाललांपूर इथ आज दुपारी हा सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा अवघ्या ४ षटकात केवळ ४४ धावांच्या बदल्यात ९ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सध्या अ गटात २ गुण मिळवून सर्वात वरच्या स्थानावर आहे.