महिला क्रिकेटमध राजकोट इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर ११६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी भारतानं निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ३७० धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं तडाखेबंद शतकी खेळी केली. तिनं ९१ चेंडूत १०२ धावा केल्या. हर्निल देओल ८९, स्मृती मंधना ७३, तर प्रतिका रावलनं ६७ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडला ७ गडी गमावून २५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. आयर्लंड क्रिस्टीना कोल्टर रॅलीनं ८० धावा केल्या भारतातर्फे दिप्ती शर्मानं ३ प्रिया मिश्रा २, तर टायट्स साधू आणि सायली सातघरेनं प्रत्येकी १ बळी मिळवला.
Site Admin | January 12, 2025 8:13 PM | Women Cricket