आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. स्मृती मंधानाची कर्णधार आणि दीप्ती शर्माची उपकर्णधार म्हणून तर यष्टीरक्षक म्हणून ऋचा घोष आणि उमा छेत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संघात प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कानवर, तितास साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे यांचा समावेश आहे. मालिकेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना १५ जानेवारीला होणार आहे. सर्व सामने राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळले जातील.