डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी, या उद्देशाने रिझर्व बँकेकडून शिष्यवृती योजना जाहीर

अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांशी संबधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशाने रिझर्व बँकेने एक शिष्यवृती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक यासाठी पात्र असतील. अर्थशास्त्र, बँकींग, क्षेत्रीय उलाढाली किंवा बँकेशी संबधित क्षेत्रात कमी कालावधीचा संशोधनासाठी त्यांना अर्ज करता येतील. सादर झालेले संशोधन प्रस्ताव, शैक्षणिक कार्य आणि मुलाखत यावर आधारित पाच शिष्यवृत्या बँक देणार आहे. पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत यासाठी अर्ज करता येतील. यासंबधीची सविस्तर माहिती रिझर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा