संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही संभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज उद्यापासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जाणार आहे; त्या दिवशी संसदेचं सत्र होणार नाही.
Site Admin | November 24, 2024 1:36 PM | parliament | Winter Session