खेलो इंडियाच्या या वर्षाच्या हंगामातल्या, हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात आज लडाखमध्ये होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
लडाख मध्ये दुसऱ्यांदा खेलो इंडियाचं आयोजन केलं जात असून, या हंगामाचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे.