डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरुन गदारोळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

 

लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित लाचखोरी प्रकरणाबरोबरच, उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

 

राज्यसभेतही दिवंगत आजी-माजी सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती, ती अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावली. भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षं पूर्ण होत आहेत, त्यामुळे संसद सदस्यांनी लोकांसमोर उच्च आदर्श प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा धनखड यांनी व्यक्त केली. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे तसंच डावे पक्ष, द्रमुक, राजद, आप यांच्या सदस्यांनी अदानी समूहावरच्या आरोपाबाबत बोलायचा प्रयत्न केला, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. संविधानदिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार नाही. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा