भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून ४० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ, भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. पर्यटन, वैद्यकीय आणि व्यावसायिक कारणांसाठी भारताला भेट देणाऱ्या मालदीवच्या नागरिकांना पूर्वीच्या व्हिसाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे.
Site Admin | December 19, 2024 8:17 PM | Winter Session of Parliament