संसद भवन परिसरात निदर्शनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपा आणि काँग्रेसने परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भाजपानं निदर्शनादरम्यान पक्षाचे दोन खासदार जखमी झाल्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपाचे नेते अनुराग सिंह ठाकूर हे बातमीदारांशी बोलत होते. तसंच काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने भाजपाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संसदेच्या मकर द्वारपर्यंत काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा दरम्यान मकर द्वार इथं जमलेल्या भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जखमी झाले असल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 19, 2024 8:09 PM | Winter Session of Parliament