लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले ३ वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च पायाभूत सुविधांवर करायचा ठरवला आहे. त्यामुळं येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असं त्या म्हणाल्या. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात किरकोळ, खाद्य आणि इंधन महागाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. युपीए सरकारच्या काळात महागाई दर १० टक्क्यांच्या वर होता. आता हा दर ५ टक्क्यांच्या खाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती शेजारी देशांपेक्षा भारतात कमी आहेत. बेरोजगारीचा दर गेल्या ५ वर्षात निम्म्यावर आल्याचंही त्या म्हणाल्या.
Site Admin | December 17, 2024 6:18 PM | Loksabha | Winter Session of Parliament