डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. 

 

त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.  बीडमधील हत्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसंच, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची तसंच याप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव सादर केला. आदरांजली अर्पण केल्यावर सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा