केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भाजपच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. नेहरु- गांधी परिवाराने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बातमीदारांशी बोलताना केला.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यां बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी संसदभवन परिसरात निदर्शनं केली. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात मोर्चा काढला केली. भाजपाचे खासदार स्वतःला वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यांनी केला.
या निदर्शनांमधे धक्काबुक्की होऊन भाजपाचे प्रताप सरंगी जखमी झाले.त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सरंगी यांनी केला आहे. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या धक्का बुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. झाल्या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली.