डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे नितिन राऊत यांनी उपस्थित केला. मंत्री आशीष शेलार यांनी त्याला हरकत घेऊन राज्यसभेतले विषय या सभागृहात घेता येणार नाही, असं सांगितलं. 

 

मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबाबतची चर्चा विधानपरिषदेत पुढे सुरू झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेतल्या वक्तव्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, विधानपरिषदेत आज विविध विधेयकं संमत करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ,  महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे सुधारणा विधेयकं, तसंच जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठीचं विधेयक, यांचा त्यात समावेश होता.

 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा