बँकिंग कायदे सुधारणा विधेयक २०२४ पारीत करण्यासंदर्भात लोकसभेत आज चर्चा करण्यात आली. या विधेयकानुसार नॉमिनीजची संख्या चारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या विधेयकानुसार बँकांना त्यांच्या लेखापरीक्षकांचे मानधन ठरवण्याचा अधिकारही देण्यात येणार आहे.
या सुधारणांमुळे बँक प्रशासनात अधिक बळकटी येणार असून ग्राहकांना चांगल्या सुविधांचा लाभ होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
तर, बँकिंग कायद्यांकडे वेगळं न पाहता देशाच्या एकूण आर्थिक स्थितीसह त्याचा विचार करायला हवा असं काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले.