हिवाळी अधिवेशनात पहिल्या पाच दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गदरोळात बंद पडल्यानंतर आज सहाव्या दिवशी प्रश्नोत्तरांचा तास आणि शून्य प्रहरा सार्वजनिक हिताच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारनं मनरेगासाठी अर्थसंकल्पात ८७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेम्मसानी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
शेतमालाच्या हमीभावात तिप्पट वाढ करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
सरकार देशातली प्राथमिक आरोग्य सुविधा बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
केप ऑफ गूड होप या दूरच्या प्रवास मार्गामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं.